एमआयडीसीतील विद्युत प्रकल्प महिनाअखेर कुलूपबंद

0
19

गोंदिया,दि.५-तालु्नङ्मातील मुडीपार(ए‘आयडीसी) येथे जिल्ह्यातील एकमव जैविक विद्युत प्रकल्प उभा आहे. २००५ साली उभारण्यात आलेला हा प्रकल्प आजघडीला शेवटची घटका मोजत आहे. एकीकडे शासन उद्योगांना चालना देण्याचे धोरण राबवित असताना टीम फेरो अलाईज प्रा.लि. या आंध्रप्रदेशातील बायोगॅस विद्युत प्रकल्प येत्या ३० नोव्हेंबर पासून कायमचा बंद करण्याचा निर्णय समुहाने घेतला. या उद्योगात सुमारे ७५-80 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना गेल्या दोन म‘हिन्यांपासून वेतन देखील मिळाले नाही. हा उद्योग बंद पडल्याने येथील कम‘चाèयांवर बेरोजगारीची कुèहाड कोसळणार आङे.
स्थानिक उद्योजकांना उद्योगाकरिता जागा आणि सोयी-सुविधा पुरविण्याकरिता जिल्ह्यात ठिकठिकाणी औद्योगिक विकास महामंडळाने जमिनी हस्तगत केल्या. त्या जमिनी अनेकांनी करारतत्वावर मिळविल्या. परंतु, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी उद्योगच उभे राहिले नाही. अनेक उद्योग बंद पडले. मुंडीपार येथील औद्योगीकविकास महामंडळाच्या जागेवर बायो विद्युत प्रकल्प गेल्या १० वर्षांपासून सुरू आहे. हा प्रकल्प जिल्ह्यातील एकमेव जैविक विद्युत निर्मीती प्रकल्प आहे. येथे धानाच्या कोंड्यापासून पाणी तापवून वीज तयार केली जाते. गेल्या काही वर्षांपासून खर्चाच्या तुलनेत उत्पादनक्षमता कमी असल्यामुळे प्रकल्प प्रशासनाला सुमारे 80 कर्मचाèयांचे वेतन आणि इतर खर्च भागविणे कठिण झाले. दोन ‘हिन्यांपासून येथे कार्यरत असलेले कर्चामरी वेतनाच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु, प्रकल्प प्रशासन पैसे नसल्याचे कारण पुढे करून त्यांची बोळवण करत आहे. येत्या ३० नोव्हेंबर पासून विद्युत निर्मती बंद करणार असल्याची ग्वाही खुद्द प्रकल्पाच्या संचालकांनी दिली. हा प्रकल्प बंद पडल्यास येथे कार्यरत ७५ कर्चामèयांवर उपासमारीची वेळ येणार आहे.