चीनचे उपराष्‍ट्रपती पोहोचले सिल्लोडच्या सोमवंशीच्या घरी

0
7
वृत्तसंस्था
औरंगाबाद ,दि.५ मुलीच्या लग्नात दिल्या जाणाऱ्या हुंड्याबाबत चीनचे उपाध्यक्ष ली युआनचाओ यांनी काहीशी नाराजी व्यक्त करत हा पैसा विकासासाठी खर्च करावा, असा सल्ला सिल्लोड येथील शिक्षक माधव साेमवंशी यांना बुधवारी दिला. या भेटीत त्यांनी किचनपासून ते बेडरूमपर्यंतची रचना प्रत्यक्ष बघितली. घरातला कारभार कसा चालतो, अादी प्रश्न विचारत युआनचाओ यांनी सोमवंशी यांच्याकडून भारतीय कुटुंबव्यवस्थेची वैशिष्ट्ये जाणून घेतली.
युअानचाअाे यांना भारतीय कुटुंबव्यवस्थेबद्दल जाणून घ्यायचे अाहे, असे डाॅ. बाबासाहेब अांबेडकर विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाचे प्रमुख विकासकुमार यांना सांगण्यात अाले. त्यांनी त्यांचे मित्र प्रा. मदन सुर्यवंशी यांचे नाव सुचवले. त्यांनी त्यांचे नातेवाईक व अजिंठा येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षक असलेल्या माधव सोमवंशी यांची शिफारस केली अाणि युअानचाअाेचा ताफा सिल्लाेडच्या टिळकनगरातील साेमवंशींच्या घरी पाेहचला.
युआनचाअाे यांनी दुभाषांच्या मदतीने ३५ मिनिटे गप्पा मारल्या. गॅस सबसिडी कशी मिळते, कुटुंबात किती व्यक्ती असतात, दोनपेक्षा जास्त मुले असल्यास पालनपोषण कसे करता, असे प्रश्न त्यांनी विचारले. सोमवंशी यांच्या मुलीला तू पदव्युत्तर शिक्षण भारतात घेणार की चीनमध्ये ? असे विचारले. तिने उत्तर देताच ‘तुला चांगला जाॅब मिळेल,’ अशा शब्दांत त्यांनी तिला अाशीर्वादही दिला.