‘हुंडाई’ची गुढीपाडवा ऑफर

0
13

नागपूर : गुढीपाडव्यानिमित्त इरोज हुंडाईने ग्राहकांना ‘विकेंड धमाका ऑफर’ दिली आहे. यात २६ आणि २७ मार्चला कारच्या स्पॉट बुकिंगवर १0 हजार रुपयांचे गिफ्ट व्हॉवचर मिळणार आहे. सोबतच गुढीपाडव्याला ग्राहकाला कारची डिलेव्हरी मिळणार आहे.
ग्राहकांसाठी विकेंड धमाका ऑफर अंतर्गत झिरो पर्सेंट डाऊन पेमेंट, आकर्षक एक्स्चेंज बोनस योजना सुरू करण्यात आली आहे. ग्राहकांनी दाखविलेल्या विश्‍वासामुळे इरोजची यशस्वी वाटचाल सुरू आहे. इरोजने आकर्षक किमतीत कार उपलब्ध केल्या आहेत, त्यामुळे ग्राहकांसाठी ही ऑफर देण्यात आली आहे. स्पोर्टी लूक असलेल्या हुंडई ग्रॅण्ड ११0 ने युथला आकर्षित केले आहे. या कारच्या खरेदीवर ५३000 रुपयांची बचत होणार आहे.
‘ईऑन’च्या खरेदीवर ३८000 व ‘वरना’च्या खरेदीवर ५0000 बचत होईल. हुंडईच्या इतर कारच्या खरेदीवर ग्राहकांची ८0 हजारापर्यंतची बचत होणार आहे. देशभरात हुंडईचे ११६0 सर्व्हिस सेंटर व ९0७ विक्री केंद्र आहेत. इरोज हुंडईने केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांसाठीही विशेष योजना राबविली आहे.