सुरेश चांडक ‘एमआरएआयए’चे अध्यक्ष

0
17

नागपूर : डॉ. सुरेश चांडक यांची महाराष्ट्र रेडिओलॉजिकल अँन्ड इमेजिंग असोसिएशन (एमआरएआयए)च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विदर्भाला ३0 वर्षानंतर हा मान मिळाला आहे.
२0 मार्च रोजी मुंबई येथे निवडणूक झाली. चांडक यांनी पुणे येथील डॉ. एम. आर. गुलाटी यांचा पराभव केला. यापूर्वी नागपूरच्या डॉ. प्रमोद कोलवाडकर यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. आतापर्यंत सर्वसंमतीने पदाधिकार्‍यांची निवड करण्यात येत होती. यावर्षी पहिल्यांदा निवडणूक झाली. त्यात चांडक यांना यश मिळाले. चांडक यांना इंडियन रेडिओलॉजिकल अँन्ड इमेजिंग असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अनुभव आहे. सदस्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करेल, अशी प्रतिक्रिया चांडक यांनी व्यक्त केली. कार्यकारिणी : अध्यक्ष – डॉ. सुरेश चांडक, महासचिव – डॉ. संजीव मणी, उपाध्यक्ष – डॉ. प्रदीप गांधी, डॉ. विजय पाटील, कोषाध्यक्ष – डॉ. समीर गांधी, सहसचिव – डॉ. संदीप कवठाले, डॉ. मंगेश थेटे, केंद्रीय कौन्सिल सदस्य – डॉ. ओमप्रकाश भांगडिया, डॉ. सोना पुणगावकर, डॉ. शैलेश कोरे, डॉ. विजय बर्वे, सदस्य – डॉ. शैलेश सांगाणी, डॉ. हेमल मणियार, डॉ. गिरीश धाडवड, डॉ. गिरीश चिर्लीकर, डॉ. उल्हास महाजन.