26.4 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home गुन्हेवार्ता घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफास

घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफास

0
85

गोंदिया :जिल्ह्यात घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. पोलिस प्रशासनाकडून अशा घटना घडू नये, यासाठी पेट्रोलिंग व इतर विशेष मोहम राबविण्यात येतात. अशातच डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत एका घरफोडी प्रकरणाचातपास करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश आले असून घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफास केला. दरम्यान पोलिसंनी एकूण ६ लाख ८१ हजार १८ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला.
सविस्तर असे की, सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे ४ फेब्रवारी रोजी यावलकर ज्वेलर्सची दुकान फोडून चोरट्यांनी दागिने व रोख लंपास केला. फिर्यादी रविंद्र यावलकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला
होता. या घटनेत एकूण ४ लाख ४० हजार तसेच शेजारी असलेल्या गजानन ज्वेलर्स या दुकानातून १ लाखाचे दागिने लंपास केले होते. तक्रारीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करीत असतांना तांत्रिक तसेच गोपनिय माहीतीच्या आधारावर सौंदड येथे ज्वेलर्सचे दुकानामध्ये झालेली घरफोडी ही पांढुर्णा मध्यप्रदेश येथील अट्टल चोरी करणारे बलवानसिंग भादा, कुंदनसिंग जुनी व त्यांच्या सोबत्यांनी केल्याचे माहिती मिळाली. त्या आधारावर घटनेतील आरोपी बलवानसिंग गब्बूसिंग भादा (३४) याला ११ मर्चा रोजी त्याच्या पांढुर्णा येथील राहत्या घरातुन ताब्यात घेण्यात आले. त्यास विश्वासात घेऊन सदर गुन्हयातबाबत विचारपुस करण्यात आली असता त्याने त्याचे दोन मित्र कुंदनसिंग जुनी व चमन सहारे रा. मुलताई मध्यप्रदेश यांचेसह मिळुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांचे इतर दोन साथीदारांचा शोध घेतला असता ते मिळुन आले नाही. आरोपी बलवानसिंग गब्बुसिंग भादा याचे घरातुन एकूण ६ लाख ८१ हजार १८ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या सुचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात सपोनि धिरज राजुरकर, पोहवा दुर्गेश तिवारी, पोशि सुनिल डहाके, पोशि राकेश इंदुरकर, पोशि संतोष केदार चापोशि घनश्याम कुंभलवार यांनी पार पाडली.