धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक मंडळ बरखास्तचा निर्णय कायम

0
11

नांदेड,दि.18 : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समिती वरील प्रशासक मंडळ बरखास्त करून सहा महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. परंतु प्रशासकमंडळाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या निण॔यास कायम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे प्रशासक मंडळाची घोर निराशा झाली आहे.
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र पोतगंटीवार यांनी धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक मंडळ शासनाकडून मंजूर करून 18 सदस्यांची नियुक्ती करून आणले होते. सदरील प्रशासक मंडळाच्या विरोधात माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्ताहारी पाटील चोळाखेकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन न्याय मागितला आहे. यावरून उच्च न्यायालयाने सदरील प्रशासक मंडळ बरखास्त करून सहा महिन्याचा आत निवडणूका घेण्याचे शासनास आदेश दिले होते. परंतु प्रशासक मंडळानी सदरील निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. परंतु न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निण॔यास कायम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्यामुळे अखेर सत्याचा विजय झाला असल्याचे प्रतिक्रिया शहरात ऐकण्यास मिळत होत्या. सदरील निण॔याचा स्वागत करून शहरातील पानसरे चौकात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस च्या काय॔कत॔नी फटाक्यांची अतिषबाजीकेल्यामुळे जनतेचे लक्ष केंद्रित झाले होते. अखेर निवडणुकीचा माग॔ मोकळा झाला आहे.