नांदेड कडकडीत बंद; भीमा कारेगाव घटनेचे तीव्र पडसाद

0
11

नांदेड, दि.०२ःपुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे सोमवारी जमलेल्या जमावावर दगडफेक झाल्याने एकाचा मृत्यू झाला यामुळे या परिसरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती याचे पडसाद संपूर्ण राज्यासह नांदेडमध्ये सुध्दा उमटले. काल सायंकाळी उशिरा आंबेडकरी नेत्यांनी पुकारलेल्या बंदला नांदेडकरणी चांगला प्रतिसाद दिला .असून आज सकाळी शहरातील काही भागात किरकोळ घटना घडल्या यामध्ये शिवाजीनगर भागात दुरुस्तीसाठी आलेल्या जिल्हाधिकरी कार्यालयाच्या गाडीचे आंदोलोकांनी काचा फोडल्या. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले तात्काळ पोलीसांनी परिस्थितीचे गाभीर्य लक्षात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. भीमा कारेगाव येथील शौर्य दिनानिमित्यआयोजित कार्यक्रम नंतर सनसनवाडी येथे दोन गटात हिंसाचार उफळला आहे. या यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला या घटनेच्या निषधार्थ मंगळवारी आंबेडकरी चळवळीच्या(दलित) संघटनानी राज्यभर बंदचे आवाहन केले होते.त्याचे पडसाद नांदेड मध्ये उमटायला सुरुवात झाली होती . संपूर्ण शहरात दलित नेते व्यापऱ्यांना प्रतिष्ठणे बंद करण्याचे आवाहन करीत होते.यामध्ये शहरातील तरोडा नाका, भावसार चौक,आनंद नगर, भाग्यनगर, श्रीनगर भागात बंद चे आवाहन करीत असताना किरकोळ दगडफेक झाली यावेळी शहरात अफवाचे पेव फुटले .यामध्ये शहरातील व्यापारीनी आपली दुकाने बंद केली तर शाळा, कॉलेज, व कोचिंग कलासेस संचालक मुलांच्या पाल्यांना साहाय्याने सुखरूप पाठवण्यात आले. यावेळी महात्मा फुले आय टी आय चौकात ते जिल्हाधिकारी कार्यलयपर्यत मोर्चा काढण्यात आला असून जातीयवादी च्या विरोधात घोषणा देण्यात आल्या तर यावेळी आंदोलन कार्यकर्त्यांनी सनसनवाडी येथे झालेल्या घटनेची त्वरित चौकशी करून कारवाई करण्यात यावी असे आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.