बिलोली च्या सामाजिक वनिकरणाचा अनागोंदी कारभार!

0
55
दुतर्फा वृक्ष लागवडीत झाला लाखों रुपयांचा भ्रष्टाचार ••••••!
नांदेड,दि.19:-  बिलोली सामाजिक वनपरीक्षेत्राअंतर्गत येणार्या धर्माबाद तालुक्यात सन 2010 ये 2013 या कालावधी मध्ये रस्त्यांच्या दोन्ही बाजूने जी दुतर्फा झाडांची लागवड करण्यात आली .या कामात बोगस मजुरांचे मस्टर व बोगस सह्या करून पोस्टमन व वनिकरण विभागातील कर्मचाऱ्याच्या संगनमताने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
हि बाब उघडकीस आणली धर्माबाद तालुक्यातील येताळा येथील रहिवासी गंगाधर माणिकराव हणमंते व सुशीला गंगाधर हणमंते यांनी.यांनी या कामावर हजेरी लावलेली नसतांना त्या बोगस मस्टर मध्ये  त्यांच्या जाबकार्ड वरून तब्बल 1लाख 40 हजार रुपयाची मजूर बोगस स्वाक्षरी करून व्ही.ए.आवरे व संबधित पोस्टमनने उचल केल्याची तक्रारच त्यांनी केली आहे.एकीकडे राज्य  शासन झाडे लावा. झाडे जगवा!या उपक्रमाच्या माध्यमातुन पर्यावरण वाचवण्याचा राज्य शासन केविलवाणा प्रयत्न  करीत आहे .तर दुसरीकडे त्याच वनिकरण विभागातील कर्मचारी हे भक्षक बनले आहेत.अशा पर्यावरणाला घातक असणाऱ्या या अधिकारी व कर्मचाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीचे निवेदन बिलोलीच्या वनीकरण विभागात 6 महिन्यापूर्वी देऊनही अद्याप पर्यंत कुठल्याच पद्धतीची कारवाई झालेली नाही.यावरून वनिकरण विभाग दोषींना पाठीशी घालून शासनाची दिशाभूल करीत असल्याचे चित्र स्पष्ट होते.पर्यावरन वाचण्यासाठी दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सामाजिक वनीकरण विभाग नांदेड यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा सामाजिक वनीकरण विभागाच्या उपसंचालकांना लेखी निवेदनाद्वारे  गंगाधर हणमंते यांनी दिला आहे .