पाऊनगावच्या पुनर्वसनाला वनखात्याची मंजूरी-शिशुपाल पटले यांच्या प्रयत्नाला यश

0
14

पवनी,दि.19ः-पवनी तालुक्यातील पाऊनगाव व अन्य गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. माजी खासदार शिशुपाल पटले यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) महाराष्ट्र राज्य यांनी मान्यता प्रदान करून १५ जानेवारी २०१८ रोजी माजी खासदार शिशुपाल पटले यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अधिसूचना प्रारूप शासनाला सादर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महसुल विभागाच्या होणार्‍या बैठकीत याला अंतीम मंजूरी मिळणार आहे. गोसेधरणाच्या बुडीत क्षेत्रात व नव्याने घोषीत झालेल्या उमरेड-पवनी-कर्‍हांडला व्याघ्र प्रकल्पात येत असलेल्या चार आबादी व चार रिठी गावांचे पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबीत आहे. आबादी गावांमध्ये पाउâनगाव, चिचखेडा, कवडसी व गायडोंगरी तर रिठी गावांमध्ये मुरमाडी, आवळगाव, धामनगाव, जोगीखेडा (हमेशा) या गावांचा समावेश आहे.
गोसेधरणाच्या पार्श्वजलामुळे या गावांना पावसाळयात बेटाचे स्वरुप प्राप्त होते. येथील नागरिकांना साथींच्या रोगांचा सामना करावा लागतो. दिड-दोन महिना यांचा संपर्क तुटलेला असतो. सोबतच जंगलव्याप्त परिसरात ही गावे असल्यामुळे वन्यप्राण्यांचा त्रास सहन करावा लागतो यामुळे अनेक विद्यार्थी बाहेरगावी जाता येत नसल्यामुळे शिक्षणापासुन वंचीत आहेत, या गावांची तातडीने पुनर्वसन करावे या मागणीचे निवेदन पाऊनगावचे सरपंच, पोलीस पाटील यांनी ८ डिसेंबर २०१७ रोजी माजी खा. शिशुपाल पटले यांना दिले होते. पाऊनगाव व अन्य गावांची समस्या गंभीरतेने घेत शिशुपाल पटले यांनी पाठपुरावा सुरु केला. नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात आदीवासी विकास व वन राज्यमंत्री आत्राम यांची २१ डिसेंबर २०१७ रोजी शिशुपाल पटले यांनी भेट घेऊन येथील वास्तव त्यांच्यासमोर मांडले. राज्यमंत्री आत्राम यांनी पाऊनगावच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले. त्यानुसार वन्यजिव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम १८ अन्वये प्रधानमुख्य वनसरंक्षक (वनबल प्रमुख) महाराष्ट्र राज्य यांनी उमरेड-पवनी-कर्‍हांडला विस्तारीत अभयारण्य म्हणुन घोषीत करण्यास मान्यता प्रदान केली आहे. त्या अनुषंगाने अधिसुचना प्रारुप शासनास सादर केला आहे. पाऊनगाव व अन्य तीन गावांच्या पुनर्वसनासंदर्भात महसुल विभागाने त्यांच्या विभागासी सबंधीत कार्यवाही पुर्ण केल्यानंतर पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मागीa लागणार आहे. याबद्दल पाऊनगाववासीयांनी माजी खा. शिशुपाल पटले यांचे आभार मानले.