अर्धापूर येथे शाॅट सर्कीटने आग लागल्याने महिलेच्या मृत्यू

0
13

अर्धापूर (प्रतिनिधी ),दि.19ः- घरी सयपांक करीत असतांना विजेच्या शाट्सर्किटने आग लागल्याने एका महीलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अर्धापूर शहरातील फुले नगर येथे मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबत माहीती अशी की,येथील फुलेनगर येथील रहिवासी देवीदास आप्पा क-हाळे हे आॅटो मोबाईल्स दुकान व्यवसाईक असून ते गौरी महालक्ष्मी सण साजरा करण्यासाठी चाभरा गावी गेले आज मंगळवारी सकाळीच सर्व कुटुंब आले होते सायंकाळी पाच वाजता सौ. मनिषा देविदास क-हाळे ह्या गॅसवर सयपांक करीत होत्या यावेळी अचानक पणे शाॅट सर्किट झाल्याने घरावरील प्लॅस्टिक पत्राणे पेट घेतला ही आग विझविण्यासाठी त्यांनी अटोकाट प्रयत्न केला पण आगीने त्यानां वेढले त्यातच त्या जळुन त्यांच्या मृत्यू झाला ह्या घटनेची माहिती इतरांना कळताताच घटना स्थळी शेजारी व सह्यायक पोलीस निरीक्षक एम.एच.मांजरमकर,फौजदार दिगंबर जामोदकर,जमादार परमेश्वर कदम,बाबासाहेब चौदंते,हेमंत देशपांडे,बालाजी कोकरे,किशोर पाटील,राजेंद्र कांबळे,संजय कळके,प्रकाश कडदनवाड,प्रकाश वावळे,माधव गिते,राजेश वारणे,मझर बुखारी,बालाजी भाकरे आदीनी धाव घेतली यांच्यासह फुलेनगरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणली पण या आगीच्या दुर्घटनेत सौ.मणिषा कऱ्हाळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांन एक मुलगा,एक मुलगी असे दोन लहान मुले असून या दुर्दैवी घटनेने फुलेनगरात हळळवक्त करण्यात येत आहे.