उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आयटकचा मोर्चा

0
15

आमगाव,दि.19ः- केंद्र व राज्य सरकारच्या सर्वसामान्य विरोधी, शेतकरी, कामगार विरोधी आर्थिक धोरण व कामगार कर्मचार्‍यांच्या विविध न्यायिक मागण्यांना घेऊन ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक)च्या वतीने आज (ता.१८) उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोच्र्याच्या माध्यमातून सरकारच्या निती व धोरणांचा निषेध नोंदवून लक्ष वेधण्यात आले. दरम्यान विविध मागण्यांचे निवेदन सादर करून मागण्यांची पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
केंद्र व राज्य सरकारने अलफलातून कारभार चालविला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, बेरोजगार, कामगार त्रस्त झाले आहेत. दरम्यान ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) च्या वतीने आज (ता.१८) ला आमगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चाकाढण्यात आला असून अंगणवाडी व बालवाडी, आशा व गटप्रवर्तक, शापोआ, कंत्राटी आरोग्य सेविका यांना १८ हजार रुपये मासिक वेतन व ३३ हजार रुपये पेन्शनचा कायदा करून ३ हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, ग्राम पंचायत कर्मचार्‍यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा व पेन्शन लागू करण्यात यावे, विद्युत कर्मचार्‍यांना पेन्शन लागु करण्यात यावी, शिक्षणाचे बाजारीकरण थांबवावे, पेट्रोल, डिझेल, केरोसीनची दरवाढ थांबवावी, महागाई कमी करण्यात यावी, आदी विविध मागण्यांना निवेदन देऊन मागण्यांची पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी केली. मोच्र्याचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष हौसलाल रहांगडाले, जिल्हा सचिव रामचंद्र पाटील, मिलिंद गणवीर, करुणा गणवीर,आदिंसह ग्राम पंचायत, अंगणवाडी,आशा व गट प्रवर्तक, विद्युत, हमाल कामगार, शालेय पोषण कामागार, बिडीकामगार, घर कामगार, शेतीमजूर आदी मोठय़ा संख्येत सहभागी झाले होते