श्री.गुरुबसव विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांचा निरोप व सत्कार समारंभ

0
60

संख(सांगली),दि.19ः येथीस श्री .गुरुबसव विद्यामंदिर व ज्यु.कॉलेजच्या वतीने ईयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा निरोप व सत्कार समारंभाचे आयोजन उत्साहात पार पडले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  श्री. शिवलिंगेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी सभापती आर.के.पाटील  होते.प्रमुख अतिथी म्हणून औरगांबदाचे बाळासाहेब शिंदे,समाजकल्याण अधिकारी महेश पोतदर,कन्नड साहित्यिक जे.बी.मिसि.पाडुरंग वाघमोडे,मुख्याध्यापक जे.आर.पाटील,उपमुख्याध्यापिका कविता पाटील,पर्यवेक्षक बी.जी.फुटाणे,अण्णासाहेब गडदे,श्री बगली,श्री. हिप्परगीर,मल्लिकसाहब मुल्ला,श्री.उमराणी,किरण पाटील, तुकाराम बिरादार,एम.जी.चौगुला ,एच.के.बिरादार, सुजाता माळी ,एस.एस.पाटील, एस.के.माळी, बी.बी.फुटाणेसर ,कविता पाटील,जे.आर.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.स्वागत भाषण आर.बी.पाटील यांनी केले तर प्रास्तविक जे.आर.पाटील यांनी केले. सुञसंचलन करडी अरविंद करडी व एम.जी.कराडे यांनी केले,आभार शिवानंद धन्याळ यांनी मानले.