ब्लॉसम स्कुलची कॅनरा बँकला भेट

0
9

देवरी,दि.19ः- नवनवीन संकल्पना राबवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचा सतत प्रयत्न करणारे ब्लॉसम पब्लिक स्कुल देवरीचे मुख्याध्यापक डॉ. सुजित टेटे यांनी विध्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान मिळावे या संकल्पनेतून विध्यार्थ्यांसह कॅनरा बँकला भेट दिली.या भेटीमध्ये कॅनरा बँक व्यवस्थापक पूनम लता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विध्यार्थ्यांना बँक खाते उघडण्यापासून तर चालान तयार करणे, पासबुक तयार करणे, लॉकर, रोकड जमा व काढणे, डी डी तयार करणे, आर डी काढणे, क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड तसेच लोन पासून तर इंटरनेट बँकिंग पर्यंतची सर्व माहिती यावेळी देण्यात आली.
प्रत्यक्षात दिलेले शिक्षण हे दीर्घकाळ लक्षात राहते आणि व्यवहारीक जीवनात त्याचा नीट उपयोग करता येते या उद्देशाने सदर भेट आयोजित केलेली होती.विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबर बँकेचे व्यवहार करणे भाग पडते, त्यांना समोर कुटलेही समस्या पडू नये हा या मागचा हेतू.विद्यार्थ्यांनी व्यवस्थापक पूनम लता यांना त्यांनी बँकिंग क्षेत्रात येण्याचा हेतू काय होता? आणि विध्यार्थ्यासाठी आपल्याला काही करता येऊ शकते का? असे प्रश्न विचारले.बँक अधिकारी विवेक पटले, प्रवीण राणे, अक्षय पटेल, आकाश बोनगीरवार , सुनील पराते यांनी मोलाचे सहकार्य केले.सर्वांचे डॉ.सुजित टेटे यांनी आभार मानले.या भेटीसाठी शिक्षक नितेश लाडे आणि हर्ष वैष्णव यांनी सहकार्य केले.