दरिकोणूर येथे म्हैसाळचे पाणी आणण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज-हभप तुकाराम महाराज

0
57

संख (राजेभक्षर जमादार),दि.11ः-शेतकर्याना पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ह.भ.प.तुकाराम महाराजांनी पुढाकार घेतला असून जत तालुक्यातील दरिकोणूर येथे आयोजित शेतकऱ्यांचा पाण्याच्या मेळाव्यात पहिल्याच दिवशी म्हैसाळचे पाणी आण्यासाठी पाईपलानकरीता स्वमर्जीने उपस्थित नागरिकांनी लोकवर्गणी करायला सुरवात केली.त्या लोकवर्गणीतून 11 लाख रूपये गोळा झाल्याची माहीती तुकाराम महाराज यांनी माहिती दिली.

जत तालुक्यातील दरीकोणूर येथे हरिभक्त तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी पाणी मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी बोलताना तुकाराम महाराज म्हणाले की, म्हैसाळ योजनेचे पाणी जत तालुक्यातील गावांना सहजासहजी मिळणे फार अवघड आहे. कारण जे पाणी आपल्याला मिळाला पाहिजे होते. परंतु येणाऱ्या पाण्याची तरतूद केली नसलेमूळे येणारे पाणी आपल्याला मिळू शकत नाही . म्हणून शासनाने खास बाब म्हणून आपल्या भागातील ओढ़े अडवून आपल्याला आवश्यक असणाऱ्या पाण्याचे नियोजन करून ते काम करण्यासाठी सर्वानी पाठीशी राहावे लागेल.शासनाकडून ज्या परवानगीची आवश्यकता आहे त्या घेऊन व शासन जेथे मदत करू शकेल अशा पद्धतीच्या नियोजन करून व लोकसहभागातून सहभागातून व श्रमदानातून सेवाभावी संस्थेमार्फत कामे पूर्ण करून आपल्या पाण्याचा प्रश्न आपल्याला सोडावावे लागणार असल्याचे म्हणाले.आपण जर एकत्र नाही आलो तर राज्यकर्त्यांकडून आपणास फक्त आश्वासनाशिवाय दुसरे काही मिळू शकणार नाही. यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपापल्या परीने आर्थिक श्रमदान लागणारे मशीनचे नियोजन करण्यास मदत केल्यास आपल्या पाण्याचा प्रश्न आपण निश्चितपणे सोडवू यात शंका वाटत नाही. मी  राजकारणाचा उद्देश ठेवून पाण्याचा प्रश्न घेऊन लोकांना जागृत करण्याचे काम करताना अनेक राजकीय पक्षातील लोकांना संशय येऊ लागला आहे. गावातील राजकीय नेतेमंडळी मदत न करता प्रत्येक जण आपापल्या नेत्याचे गुणगान गाण्याचे काम करत असतो पण त्यांच्या वागण्याने गावाचे आपल्या गावातील बांधवांचे किती आर्थिक नुकसान होत आहे, याचे भान राजकीय लोकांना नाही या प्रश्नाचा हाताळताना कोणताही राजकीय उद्देश न ठेवता मी सर्वांना पाणी मिळाले पाहिजे या उद्देशाने लोकजागृती करून पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हणाले.याप्रसंगी गावातील अंबरनाथ पाटील, माझी सोसायटीचे व्हाईस चेअरमन सदाशिव व्हनमाने , माजी सरपंच विश्वास भोसले ,बसपाचे जकप्‍पा सर्जे ,आंबाण्णा पाटील ,उपसरपंच रघुनाथ नागणे ,बबन भोसले, बंडू व्हनमाने ,सद्दाम पठाण ,बागल शेख, पोपट भोसले , बसवंत पाटील ,चंदू पाटील . यांच्यासह गावातील मोठ्या श्लोक उजनी शेतकरी उपस्थित होते.