29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ ओबीसींच्या स्वतंत्र जनगणेसाठी खा.नवनित राणा यांना बहुजन युवा मंचचे निवेदन

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणेसाठी खा.नवनित राणा यांना बहुजन युवा मंचचे निवेदन

0
20

गोंदिया,दि.११ः- युवा बहुजन मंच गोंदिया जिल्ह्याच्यावतीने अमरवातीच्या खासदार नवनित राणा व बडनेराचे आमदार रवि राणा यांना ओबीसी समाजाची स्वतंत्र जातवार जनगणना करण्यात यावी या मागणीचे निवेदन युवा बहुजन मंचचे जिल्हाध्यक्ष सुनिल भोंगाडे यांनी दिले.इंग्रजाच्या काळात ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यातआली.त्यानंतर मात्र अद्यापही झालेली नाही.तत्कालीन प्रधानमंत्री देवेगौडा यांनी ओबीसी जनगणना करण्याची घोषणा केली होती परंतु सरकार कोसळेल आणि त्यानंतर आलेल्या अटलबिहारी सरकारने तो प्रस्ताव रद्द केला.२०१४ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारने न्यायालयात हलपनामा सादर करुन ओबीसी जनगणनेची गरज नसल्याचे सांगत ओबीसी जनगणनेचा एकप्रकारे विरोध केला असून सरकारने ओबीसींची स्वतंत्र जनगणना करुन त्यांची आकडेवारी जाहीर करुन त्यांच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व देण्याची मागणी निवेदनात केली आहे.