संख परिसरात अवैध मटका व्यवसाय तेजीत

0
41

संख(राजेभक्षर जमादार),दि.11ः-उमदी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या संख परिसरातील अनेक गावात अवैध धंदे जोमात सुरू असुन याकडे मात्र पोलीसांचे दुर्लक्ष असल्याची ओरड सुरु झाली आहे.संख पोलीस चौकीच्या अतर्गत एकुण येणारे गाव संख ,अंकलगी ,गोधलेवाडी ,पाढंरेवाडी ,पाडोंझरी ,मोठेवाडी, कागणरी ,तिकुंडी ,करेवाडी, जाल्याहाळ खुर्द ,भिवर्गी , खंडनाळ ,आसंगी तुर्क ,दुळकरवाडी ,असे एकुण चौधा गावे संख पोलीस चौकी अतर्गत येते.त्या पैकी मटका अडा संख ,तिकुंडी, अंकलगी ,भिवर्गी ,कागणरी पाडोंझरी, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धंदा जोमात चालू असताना पोलिसांना का दिसत नाही असा प्रश्न ग्रामस्थानी उपस्थित केला आहे.जत तालूक्यातील संख येथे मटका व वाळू , वृक्ष तोड , परिसरातील अनेक ठिकाणी दुचाकीव्दारे हातभट्टी दारू पुरवली जाते.
संख येथे अठवडा बाजारात संख परिसरातील बाजारासाठी आलेले शेतकरी व विद्यार्थी हे मटका ऐजन्टकडे गर्दी करीत असल्याचे बोलले जात आहे.पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे संख परिसरातील शेतकरी ,मजुर आणि शालेय विद्यार्थी या जुगार मटक्याच्या आहारी गेले आहेत. बाजाराच्या दिवशी, अनेक टपरी व घराच्या भिंतीच्या आड रस्त्यावर तर अवैध धंदाना जोर असल्याचे म्हणने आहे.मटक्याच्या आकड्यांची चातसारखी वाट बघत असतात . शेतकरी ,मजूर,विद्यार्थी हात भट्टी अड्यावर मद्य प्रशासन करीत असल्याचे चित्र नित्याचेच झालले, आहे.परिसरातील सर्वच गावातून गावातील एका ठरावीक व्यक्तीमार्फत मटक्याचे रक्कम गोळा करणे .मटका लागल्यास घरपोच पैसे नेऊन देणे व कमिशन घेणे, अशी कामे होत असल्याची चर्चा आहे.

संबंधित बाबीवर नियंत्रण ठेवणे पोलीस मात्र केवळ कर्तव्य बजावत आहेत .अवैध धंद्येवाल्यांच्या “अर्थ ” पुर्ण भेटी घेऊन कोणतीही कारवाई करत नसल्याने सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या अवैध धंद्यामुळे संख परिसरातील ग्रामस्थांचे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. महिला वर्गाला मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्हा पोलिस अधिक्षकांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.