परिचर वसतिगृहात विद्यार्थ्याकडूनच बनवितो स्वयंपाक!

0
17

भंडारा ,दि.११ः- शहरातील म्हाडा कॉलनीत मातोश्री सोनाबाई गोस्वामी मागासवर्गिय मुलांचे वसतिगृहात परिचर विद्यार्थ्यांच्या मदतीने स्वयंपाक व अन्य कामे करवून घेत असल्याचा प्रकार जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या तक्र ारीतून पुढे आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी याच वसतिगृहाच्या अधीक्षकाने केली आहे.विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील तेढा येथील संजय गांधी हायस्कूलमध्ये कार्यरत छगन घुग्गुसकर हे परिचर म्हणून कार्यरत आहे.
तक्रारकर्ता सुधीर मते हे या वसतिगृहाचे अधीक्षक आहेत. परंतु, संस्थेने त्यांना अनधिकृतपणे निलंबित केले असून , समाजकल्याण विभागाचे त्याला अद्याप मंजुरी दिली नसल्याचे मते यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ते वसतीगृहात जातात. परंतु, त्यांना कोणतेही काम करू दिले जात नाही. या वसतिगृहात ५ ते १0 व्या वर्गातील २४ विद्यार्थी संख्या आहे. या वसतिगृहात स्वयंपाकी, चौकीदार कार्यरत नाही. त्यामुळे विद्यार्थीच गॅसवर नाश्ता बनवितात तसेच अन्य कामे करतात. परिचर या वसतिगृहात विद्यार्थ्यांना हाताशी धरून स्वयंपाक करतात. सध्या पावसाळय़ाचे दिवस असल्याने वसतिगृहाची स्वच्छता, रात्रीची सुरक्षितता आणि अन्नातून विषबाधा होऊन अनुचित घटना घडण्याची भिती आहे. वसतिगृहात विद्यार्थ्यांकडून काम करवून घेणे हे हा गुन्हा असल्याने या प्रकाराची त्वरित दखल घेऊन चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुधीर मते यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या तक्र ारीतून केली आहे.