रविवारला दांडेकर सभागृहात सेवानिवृत्तीपर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन

0
18

सांगली,दि.01ः- जिल्ह्यातील मिरज डि. एड.कॉलेज मिरजच्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्यावतीने येत्या रविवारला .4 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता दांडेकर सभागृह विश्रामबागेत विद्यालयाचे प्राचार्य गौतम शिंगे यांच्या सेवानिवृत्तीपर कार्यक्रमाचे तसेच विशेष निवडक्षेत्रात काम करणारे हरिभाऊ गावडे,विनायक शिंदे,दिलीप वाघमारे,अरविंद गावडे,सुरेश नरुटे यांचा विशेष सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.हा कार्यक्रम माजी विद्यार्थी सुरेश रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. 18 नोंव्हेंबर 2018 ला झालेल्या माजी विद्यार्थी मेळाव्याला राज्यातून सुमारे 500 माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यावेळी सर्व कार्यक्रम मिळून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता,त्यानुसार येत्या रविवारी दि.4 ऑगस्ट रोजी ( सकाळी 10 ते 1) प्राचार्य गौतम शिंगे यांच्या सेवनिवृत्तीचा कार्यक्रम घेण्यात आहे. तरी सर्वानी तन-मन-धनाने योगदान देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सहकार्य करावे असे आवाहन माजी विद्यार्थी सत्कार समिती कार्याध्यक्ष कुंदन जमदाडे यांनी केले आहे.