संख येथे महालोक आदालत

0
15

संख,दि.10(राजेभक्षर जमादार)ः-जत तालुक्यातील संख येथे तालुका विधी सेवा समिती,पंचायत समीतींच्या नेतृत्वाखाली संख येथे ग्रामपंचायतमध्ये दिवाणी व फौजदारी प्रकरणाचे आणि दावा दाखल पुर्व प्रकरणासबंधी तडजोड करण्यासाठी लोक आदालत घेण्यात आली.दिवाणी व फौजदारी प्रकरणाचे आणि दावा दाखल पुर्व प्रकरणाचे एकुण केस ४० पैकी ०६ केस न्यायाधीश एस.ए.उपाधे यांनी लोकांमध्ये तडजोड करून व समजुत देऊन ०६ प्रकरण निकाली काढण्यात आले.यावेळी उपस्थित अॕड.हादीमनी ,अॕड.करे, अॕड.दुधाळ ,अॕड.केंगारे ,तसेच न्यायालयनचे कर्मचारी व पंचायत समीती कर्मचारी ,मोबाईल व्हॕन व संखचे सरपंच सौ.मगलताई पाटील ,ग्रामसेंवक नरळे ,व सर्व कर्मचारी , ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.संखचे सरपंच मंगलताई पाटील यांनी निवृत्त न्यायाधीश मा.एस.ए.उपाधे यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्तविक अॕड.करे यांनी आले सर्व कर्मचारी ओळख करून दिले.सदर या दिवाणी व फौजदारी प्रकरणेसाठी आलेले भिवर्गी ,मुचंडी ,जाडबोबलाद , अंकलगी, करजगी ,संख या ठिकाणाहून लोंक आदालतसाठी आले होते .तर यावेळी अनेक लोंक प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती.