मुख्यमंत्री फडणवीसांना गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून 11 हजार राख्या पाठविणार

0
13
गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.10_ – भावा-बहीणीच्या नात्यातील गोडवा व्यक्त करण्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधानाच्या माध्यमातून बहीण-भावाचे नाते अधिक बळकट केले जाते. या रक्षाबंधनाच्या निमित्ताने गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 11 हजार राख्या पाठविण्याचा संकल्प विधानसभा क्षेत्राच्या भाजपा महिला आघाडी संयोजिका तथा नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी केला आहे.
इंदिरानगर येथे भाजपा महिला आघाडीच्यावतीने शक्ती सन्मान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा योगिता पिपरे बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा क्षेत्राच्या भाजपा महिला आघाडी संयोजिका तथा नगराध्यक्षा योगिता पिपरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून न.प.चे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेवक प्रविण वाघरे उपस्थित होते.
पुढे बोलतांना नगराध्यक्षा पिपरे म्हणाल्या, रक्षाबंधनाच्या निमित्ताने मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 11 हजार राख्या पाठविणार आहोत. त्यासाठी बचत गटाच्या महिलांना पाॅकीट वाटप केले असून प्रत्येक महिलांनी आपआपल्या वार्डात जाऊन पाॅकीटात राख्या गोळा करावे असे सांगितले आहे. गडचिरोली शहरामधून 2 हजार राख्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी सांगितले. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील गडचिरोली, धानोरा व चामोर्शी या तालुक्यांमध्ये मुख्यमंत्र्यांना राख्या पाठविण्यासाठी सभा घेण्यात आल्या. यावेळी शाखेचे प्रमुख अशोक नैताम, करुणा भुरसे, शुभांगी चापले, चंदा बुरांडे, नम्रता खोब्रागडे, माधुरी कंदीकूरवार, वर्षा शेडमाके, वर्षा खेवले, भाजपाचे पदाधिकारी, बचत गटाच्या महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.