दरीबडचीत विनापरवाना वाळू तस्करी करणारा टॅक्टर पकडला

0
8

संख,दि.30ः- दरीबडची (ता.जत) येथे बुधवारला ओडापात्रातून टॅक्टर मधून विनापरवाना अवैध गौणखणिज वाळू भरून नेताना संख अपर तहसिल कार्यालयाच्या पथकांने कारवाई केली.दरीबाडची ओडापात्रातून टॅक्टरमधून वाळू तस्करी होत असल्याची माहिती खबर्याव्दारे पथकाला मिळाली.त्या आधारे पथकाने छापा टाकला असता विनानंबरची व मालकीची दिलीप महादेव वाघ यांची मंहिद्रा कंपनी गाडी नंबर-एम.एच.१०-एस- ६०६७ हा ओढ्यातील वाळू भरत असताना आढळून आला.पथकांने टॅक्टर ताब्यात घेत दंड १लाख ४९ हजार ४७५ रू.असे दंड करण्यात आले.
संख अप्पर तहसिलदार प्रशांत पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यांची टिम एल.एल.भडके अवल कारकुन ,सोनुले -लिपीक ,चन्नापा भोसले कोतवाल ,मडप्पा कोळी कोतवालयांनी हि कारवाई केली.तर राजेश चाचे तलाटी संख यांनी घटनास्थळी संख तहसिल कार्यालय येथे टॅक्टर ताब्यात घेऊन पंचनामा करून दंड निश्चित केला .