संख(राजेभक्षर जमादार),दि.13ः-म्हैसाळ योजनेतून पाणी मिळावे तसेच योजनेत म्हैसाळ गावाचा समाविष्ट करावा यासाठी संख (ता.जत) येथील ग्रामस्थांनी गावबंद ठेवून जो पर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदन ग्रामस्थांनी अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ यांना दिले.पूर्वभागातील म्हैसाळ योजनेपासून 64 गावे वंचित आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या गावांचा समावेश योजनेमध्ये करावा अशी मागणी करण्यात आली होती. मूळात या गावांचा समावेश म्हैसाळ योजनेच्या आराखड्यामध्ये नाही. त्यामुळे या गावांना पाणी मिळणे अशक्य आहे.ग्रामस्थ पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. गेल्या पन्नास वर्षात पाण्यावर अनेक नेत्यांनी राजकारण केले आहे.आतापर्यंत फक्त आश्वाशिवाय काही मिळालेेेले नाही .त्यामुळे सर्व गावातील ग्रामस्थ एकत्रित येत निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भीमाशंकर बिरादार म्हणाले आम्ही पन्नास वर्षापासून पाणी मागतोय याचे सरकारला याची जाणीव नाही.म्हैसाळ योजनेच्या विस्तारित तत्वता मान्यता ही खासदारी मिळवण्यासाठी होते आताही आमदारकीसाठी असंच काहीतरी कोणतर आश्वासने घेऊन येणार आहे.गावागावात जाऊन लोकांना जागृत करत या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार हे निश्चित आहे.
तुकाराम महाराज यांनी पाण्यासाठी संघर्ष करण्याची मानसिकता ठेवण्याची गरज यावर 64 गावातील शेतकऱ्यांचा मेळावा गुड्डापूर तलाव येथे रविवारी 15 सप्टेंबरला आयोजित केला आहे. या मेळाव्याला उपस्थित राहावे आवाहन केले.यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी मेळाव्याला पाठींबा जाहिर करीत राजु पुजारी, चंद्रशेखर रेबगोंड, शिव सेना तालुका प्रमुख अंकुश हुवाळे, व्यंकटेश जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.




