30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ प्रकाश बघेले बनले सोनी तंमुस समितीचे अध्यक्ष

प्रकाश बघेले बनले सोनी तंमुस समितीचे अध्यक्ष

0
29

गोरेगांव,दि.१३ः तालुक्यातील सोनी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित विशेष ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश बघेले यांची निवड करण्यात आली.या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी उषाताई वलथरे होत्या.ग्रामसभेला 114 च्याजवळपास नागरीक उपस्थित होते.यावेळी ग्रामपंचायत सदस्यासंह सर्व समित्यांचे पदाधिकारी सुध्दा उपस्थित होते.