29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home मराठवाडा/खान्देश ” जीवन गौरव ” पुरस्कारासाठी शिक्षकांना प्रस्ताव  पाठविण्याचे आवाहन   

” जीवन गौरव ” पुरस्कारासाठी शिक्षकांना प्रस्ताव  पाठविण्याचे आवाहन   

0
46

औरंगाबाद :- बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जीवन गौरव शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक  मासिकाच्या चौथ्या  वर्धापन दिनानिमित्ताने राज्यातील शिक्षक बंधू- भगिनीसाठी ” जीवन गौरव ”  पुरस्कार हा सपत्निक प्रदान केले जातात जीवन गौरव पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. या पुरस्कारासाठी शिक्षक  बंधू- भगिनींना आवाहन करण्यात येत आहे आपल्या शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक कारकीर्दीचा प्रस्ताव दिनांक : २५  आॕक्टोबर २०१९ पर्यत पाठवायचे आहे
राज्यभरातील अनेक शिक्षक बंधू-भगिनी आपल्या अध्यापनाचे कार्य मोठ्या तळमळीने व उस्ताहाने करीत आहेत. त्यात शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक,  कार्यातही हातभार लावत आहेत आशा गुरुमाऊलींचा गौरव अवश्य व्हावा, ही जीवन गौरव मासिकाची भूमिका आहे. याच अनुषंगाने शिक्षक बंधू-भगिनींकडून प्रस्ताव मागविले जात आहेत. या पुरस्काराचे स्वरुप असे आहे की, पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आकर्षक स्मृतीचिंन्ह, मानपञ, पुस्तक ,शाल ,पेन इत्यादी  सपत्निक प्रदान केले जातात.संयोजक संपादक जीवन गौरव कार्यालय प्लाँट नं . २७ , आनंदनगर , गल्ली नंबर ६ , गारखेडा परिसर औरंगाबाद – ४३१००९ या पत्यावर आपले प्रस्ताव एक प्रतीत व दोन रंगीत छायाचिञासह पाठवावयाचे आहेत.अधिक माहितीसाठी संपादक रामदास वाघमारे मो.नं. ८८८८१२५६१० , उपसंपादक डि.बी. शिंदे -8983369430 ,  सहायक संपादक डाॕ. रत्ना चौधरी – 9096193665 ,   कार्यकारी संपादक मु.अ.  संदीप सोनवणे मो.नं. 9096623827 ,  यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या सचिव श्रीमती मीरा वाघमारे, प्रेरणा अझादे, अंन्सीराम वाघमारे , कमल वाघमारे , राहूल जाधव , लता अचलखांब , प्रेम सपाटे, श्रीमती  कल्पना फुसे, भाग्यश्री इसलवार,  श्रीमती रुपाली बोडके, श्रीमती वैशाली भामरे,वंदना सलवदे वाघमारे ,  बाळासाहेब निकाळजे,पंडीत डोंगरे, आजय खिल्लारे,  प्रा.डाँ.सतीश मस्के, प्रा.डाँ.अशोक डोळस,दिनेश वाडेकर, महादेव हवालदार  विजय पाताडे, देविदास बुधवंत, मु.अ. संतोष दातीर , मु.अ. नागनाथ घाटूळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.