संख(राजेभक्षर जमादार),दि.16ः-जत पूर्व भागातील शेतकऱ्यांनी ह.भ. प.पू. तुकारामबाबा महाराज यांचे पुढाकाराने येत्या निवडणुकीवर बहिष्कार घालायचे ठरवले.कुणीही उमेदवाराने विधानसभेसाठी निवडणूक लढवू नये अशी भूमिका घेतली तर निवडणूकीपेक्षा येथील जनतेच्या निर्णयाला पाठिंबा देणार असल्याचे भूमिका जत विधानसभेसाठी इच्छुक असणारे उद्योगपती सी.आर. सांगलीकर यांनी गुड्डापुर तालुका जत येथे पत्रकार बैठकीत जाहीर केला.
पुढे बोलताना, सी आर सांगलीकर म्हणाले की निवडणुका येतात आणि जातात परंतु हा कायम दुष्काळी असलेल्या गावांचा कायापालट करण्यासाठी कोणीही राजकारण अद्यापर्यंत प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही जे काय केल्याचा दावा काही लोक करत आहेत .पण शासन स्तरावर म्हैसाळ योजनेच्या पाण्याबाबत कृष्णा खोरे योजनेसाठी पाणी लवादाने या तालुक्यातील गावांसाठी किती पाणी देण्यात येणार आहे यांची याची माहिती देखील येथील राजकारण्यांना नसावी हे यांचे अज्ञान की जनतेला फसवून निवडणुकीत मतदान घ्यायचे आणि निवडणूक संपली की पुन्हा आपल्या कामाला लागायचे हे ठरलेले दिसत आहे .त्यामुळे जो आज गुड्डापूर येथील 64 गावातील शेतकऱ्यांचा जो मेळावा आयोजित केला आहे मेळाव्यामध्ये घेण्यात आलेले निर्णय जर गावातील प्रत्येक गावाने घेतल्यास गावांच्या गावांना पाठिंबा देण्यासाठी शेतकरी आणि जनता येथील जनता जो निर्णय घेईल त्या निर्णयास ठाम राहून माझी निवड विधानसभेची भूमिका राहणार आहे.तरी जत तालुक्यातील जनतेने पाणी योजनेसाठी संघर्ष करावयास तयार राहावे असे आवाहन केले .
Home मराठवाडा/खान्देश जत पूर्व भागातील जनतेच्या निर्णयास पाठींबा देऊन जत विधानसभेसाठी भूमिका घेणार -सी...




