गोंदिया,दि.23 : मुलांमध्ये शिक्षणाप्रती आवड निर्माण व्हावी, शिक्षणाकडे त्यांचा कल वाढावा व शिक्षणाच्या प्रवाहात यावे यासाठी उडान महिला शक्ती संघटनेच्या वतीने चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी सघटनेच्या अध्यक्ष हिमेश्वरी कावळे, सचिव शालू कृपाले, रजनी टिकरीया, कलावती साठवणे, आशा सूर्यवंशी, सुरेखा भेंडारकर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. हा अभिनव उपक्रम फुलचूर येथील सुरक्षा कॉलोनी येथे घेण्यात आला. प्रत्येक वर्षी व विविध कार्यक्रमांतर्गत समाजप्रबोधनाचे कार्यक्रम या संघटनेच्या वतीने करण्यात येत असतात. तेव्हा यंदाही शाळकरी मुलांना संघटनेच्या वतीने पेन, वह्या, पुस्तक, पेन्शील आदी शैक्षणिक साहित्य भेट देवून त्यांना उतुंग भरारी घेण्याची प्रेरणा देण्यात आली.




