25.7 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home मराठवाडा/खान्देश जत भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी आघाडीला पाठिंबा द्या

जत भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी आघाडीला पाठिंबा द्या

0
36

जत(राजेभक्षर जमादार),दि.18ः- काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस,रिपाई महाआघाडीचे उमेदवार विक्रमदादा सावंत यांच्या जाहिर प्रचारसभेत बोलतांना कर्नाटकचे माजी गृहमंत्री एम.बी.पाटील म्हणाले की तुबची – बबलेश्वर या योजनेचे सर्वस्व आपण असून या योजनेचे पाणी कोट्टलगी जवळ आलेले पाणी बोर नदीत सोडून जतच्या पूर्व भागातील एकूण 13 गावांना आठ दिवसात पाणी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली.मतदारसंघाच्या विकासासाठी तसेच राज्याच्या विकासासाठी महाआघाडीच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने निवडून देण्याचे आवाहन केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधानसभेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अधिकाधिक उमेदवार निवडून येण्यासाठी विक्रमदादा सावंत  यांना निवडून देण्याचे आवाहन केले. तसेच राष्ट्रवादीतून बाहेर जाऊन तिसरी आघाडी केलेल्यांनी परत यावे अजूनही संधी गेलेली नाही असे पाटील म्हणाले.यावेळी राजस्थानच्या महिला बालकल्याण  मंत्री सुष्मिता देव यांनी ही जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून दिल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. महाराष्ट्र मध्ये सर्वत्र कॉंग्रेसचे जोरदार ताकत आहे. तसेच भाजप हे फक्त आश्वासन देणारा पक्ष असल्याची टिका केली. प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी काळा धन बाहेर आणू असे म्हणून निवडणूक लढवले अद्याप कुठलेही काळाधन बाहेर आलेला नाही. आता निवडणूक लढविण्यासाठी फक्त 370कलम हे महाराष्ट्रात वापरत आहेत. आपल्या शेतकरीसाठी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष भक्कम असून त्यासाठी विक्रमदादांना निवडून द्या व दुष्काळी जत तालुक्यातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आघाडीला मतदान करून निवडून द्या असे आवाहन केले.युवा कॉग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष विश्ववजित कदम यांनी डपळापूर व लवंगा येथे साखर कारखाना निवडणूक झाल्यानंतर चालू करणार असून बेरोजगार मुलांना काम देऊ असे आश्वासन दिले.सभेला नाना शिंदे, उत्तम चव्हाण जत तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष ,भूपेंद्र कांबळे, एम आर जिगजेणी, हनमंतराया बिरादार,आदी मान्यवर उपस्थित होते.