28.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home मराठवाडा/खान्देश पाणी,शेतकऱ्यांचे व जुनी पेंशनचा प्राधान्य क्रमाने सोडू – आ.विक्रम सावंत

पाणी,शेतकऱ्यांचे व जुनी पेंशनचा प्राधान्य क्रमाने सोडू – आ.विक्रम सावंत

0
30

जत,दि.11ःमहाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या शिलेदारानी आमदार विक्रमदादा सावंत यांची भेट घेत विजयी झाल्याबद्दल सत्कार केला तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.1नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या dcps धारक बांधवांच्या संघटनेने आ.सावंतकडे व्यथा मांडल्या.जुनी पेंशन मिळवण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवण्यासाठी विनंती करण्यात आली.यावेळी आ. सावंत यांनी तालुक्यात पहिला आणि महत्वाचा पाणी प्रश्न, दुसरा शेतकऱ्यांचे प्रश्न आणि तिसरा प्रश्न जुनी पेंशनचा असेल असे आश्वासन दिले.
जो पर्यंत पेन्शनचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागत नाही, तोपर्यंत संपूर्ण ताकतीने लढणार आणि न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीन असे यावेळी सांगितले.शिक्षण सेवकांना आजच्या महागाईच्या काळात केवळ 6000 रु.मानधन मिळत आहे.त्यासाठीही आवाज उठवण्यास विनंती केली असता म्हणाले,”आज मजुरी करणाऱ्यास किमान 400रु.मजुरी मिळते.या मानधनात नक्की वाढ झाली पाहिजे.हाही प्रश्न विधिमंडळात उपस्थित करणार.असे दादा म्हणाले.या प्रसंगी तालुकाध्यक्ष गुरुबसू वाघोली,माजी तालुकाध्यक्ष शाम राठोड, तानाजी कांबळे,रमेश कोळी,रवी वारद,संदीप कांबळे,विशाल कोमावार,होसमनी,नदाफ,महादेव भोसले,चौगुले,कांबळे, प्रवीण हिटनळी,शिवाजी औताडे,इम्रान नदाफ व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे शिलेदार उपस्थित होते.

blank