28.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home राजकीय सत्ता स्थापनेतून भाजपाची माघार;शिवसेनेला सत्तास्थापनेचे आमंत्रण

सत्ता स्थापनेतून भाजपाची माघार;शिवसेनेला सत्तास्थापनेचे आमंत्रण

0
30

मुंबई,दि.11ः-सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह कोअर कमिटीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी भाजपा सरकार स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही, अशी माहिती राज्यपालांना दिल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला आमंत्रण दिले आहे. उद्या (सोमवार) संध्याकाळी ७.३0 वाजेपर्यंत शिवसेनेला वेळ देण्यात आली आहे. याबाबत राज्यपालांनी पत्रद्वारे कळविले आहे.
निकाल लागून दोन आठवडे उलटल्यानंतरही सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला नव्हता. अखेर शनिवारी (९ नोव्हेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले होत. त्यानंतर भाजपाने सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या. रविवारी भाजपाच्या कोअर कमिटीच्या दोन बैठका झाल्या. बैठकीनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा सरकार स्थापन करणार नसल्याची माहिती दिली.
राज्यातील जनतेने भाजपा-शिवसेना युतीला जनादेश दिला होता. सोबत काम करण्यासाठी हा कौल होता. मात्र, शिवसेनेने भाजपासोबत सरकार स्थापन करण्यास असर्मथता दर्शवली आहे. आम्हाला जनादेशाचा अपमान करायचा नव्हता. त्यामुळे आम्ही राज्यपालांची भेट घेऊन भाजपा सरकार स्थापन करणार नसल्याचे सांगितले आहे, असे पाटील म्हणाले.
शिवसेनेसंदर्भात बोलताना पाटील म्हणाले, शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीसोबत सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाच्या शिवसेनेला शुभेच्छा आहेत, असे पाटील यांनी सांगितले. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यासोबत गिरीश महाजन, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, आशिष शेलार हे नेतेही उपस्थित होते.

राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने आज सत्ता स्थापन करण्यात असर्मथता दर्शविली आहे. सत्ता स्थापन करण्याची मुदत देण्यात आल्याने आता शिवसेनेला आकड्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सत्ता स्थापन करण्यात असर्मथ असल्याचे राज्यपालांना सांगितल्यानंतर राज्यपालांनी दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. सोमवारी सायंकाळी ७.३0 वाजेपयर्ंत शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याची मुदत देण्यात आल्याने शिवसेनेला आकड्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.आपण सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे चेंडू आता शिवसेनेच्या कोर्टात आहे

blank