घरगुती सिलिंडरच्‍या किमतीत घट

0
7

नवी दिल्‍ली दि.१: – पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती गॅस सिलिंडर 44.50 रुपयांनी स्‍वत केला आहे. मात्र, व्‍यावसायिक सिलिंडरचा वापर करणाऱ्यांना महागाईची झळ सोसावी लागणार असून, त्‍यांना जे सिलिंडर 1155.50 रुपयांना मिळत होते त्‍यासाठी आता 1,200 रुपये मोजावे लागणार आहेत तर नवीन दरानुसार घरगती सिलिंडरची किंमत 517 रुपये राहणार आहे.

सध्‍या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 615.50 रुपये आहे. यामध्‍ये आता 44.50 रुपयांची बचत होणार आहे. दरम्‍यान, सिलिंडरची किंमत कमी झाल्‍याने ग्राहकांना प्रति सिलिंडर मागे मिळणारी सबसिडीसुद्धा कमी मिळणार असून, ती 177.68 रुपये एवढी राहणार आहे.