विकासाची भाषा बोलणारे मोदी स्वत:चं दुकान चालवतात – मनमोहन सिंग

0
7
नवी दिल्ली, दि. १४ – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तोंडी विकास असतो, प्रत्यक्षात मात्र ते आपलं दुकान चालवतात असा आरोप माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला आहे. जवाहरलाल नेहरूंची १२६ वी जयंती काँग्रेस कार्यकर्त्यांनी साजरी केली, त्यावेळी सिंग व अन्य काँग्रेस नेत्यांनी मोदींवर टीका केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
जर मागासवर्गीय, मागास जाती जमाती आणि सगळ्या स्तरांवरील लोकांचा विकास झाला नाही तर मोदींच्या विकासाला काही अर्थ नाही असे सिंग म्हणाले.
नरेंद्र मोदींना संसदेमध्ये काहीही स्वारस्य नसून, विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यामध्ये पंतप्रधान व सरकारला किंचितही रस नसल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी केली.
भारत हा सहिष्णू देश असल्याचे मोदी लंडनमध्ये बोलतात, भारतात नाही अशी टीकाही गांधी यांनी केली आहे.