भूपेंद्र रजनीकांत पटेल असतील गुजरातचे नवे मुख्यमंत्री

0
42

विजय रुपाणी यांच्या राजीनाम्याच्या 24 तासांच्या आत गुजरातच्या नवीन मुख्यमंत्र्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. भाजपने भूपेंद्र रजनीकांत पटेल यांना राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. भूपेंद्र पटेल यांचे नाव एकदाही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत दिसले नाही. केंद्रीय मंत्री आणि पक्ष निरीक्षक नरेंद्र सिंह तोमर यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर त्यांच्या नावाची घोषणा केली.

भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणाऱ्या विजय रुपाणी यांनी भूपेंद्र भाई पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव दिला. उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी याला समर्थन दिले. यानंतर विधीमंडळ पक्षाने पटेल यांच्या नावाला मंजुरी दिली. भूपेंद्र भाई लवकरच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, दरम्यान, त्यांनी शपथविधीची तारीख जाहीर केली नाही.

विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर विजय रुपाणी यांच्यासोबत भूपेंद्र पटेल.
विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर विजय रुपाणी यांच्यासोबत भूपेंद्र पटेल.

आनंदीबेनच्या सांगण्यावरून आमदाराचे तिकीट मिळाले होते
2017 च्या विधानसभा निवडणुकीत अहमदाबाद जिल्ह्यातील घाटलोदिया मतदारसंघातून भूपेंद्र रजनीकांत पटेल यांनी काँग्रेसच्या शशिकांत वासुदेवभाई पटेल यांचा पराभव केला. गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी 2017 च्या विधानसभा निवडणुकीत लढण्यास नकार दिला होता. यानंतर भूपेंद्र पटेल यांना केवळ आनंदीबेनच्या सांगण्यावरून घाटलोदिया सीटवरून तिकीट देण्यात आले. पटेल यांनी ही निवडणूक 80 हजारांहून अधिक मतांनी जिंकली. निवडणुकीच्या वेळी त्यांनी 69 लाख 55 हजार 707 रुपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे विजय रूपाणी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया हेही भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित होते.
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे विजय रूपाणी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया हेही भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित होते.