जाट आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण, 1 ठार 9 जखमी

0
7
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. 19 – आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या जाट समाजाच्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं असून पोलीसांच्या गोळीबारात एक ठार तर नऊ जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. जवळपास पाच हजारांच्या जमावानं केलेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागलं आहे. या जमावानं हरयाणाचे अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू यांच्या घराला आग लावल्याचं वृत्त आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी केलेल्या गोळीबारात 1 ठार तर नऊ जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
जमावानं इन्स्पेक्टर जनरल यांच्या कार्यालयावरही दगडफेक केली आहे. पोलीसांनी या ठिकाणच्या जमावाला पांगवण्यासाठीही गोळीबार केल्याचे वृत्त आहे.