मनसेच्यावतीने शिवजयंती उत्साहात

0
5

गोंदिया,दि. १९-छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८ व्या जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया तर्फे जानकीदेवी चौरागडे हायस्कूल मधे “शिवरायांचा आठवावा प्रताप” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे आणि त्यांचा पराक्रम दाखवणारे चित्र देखावे मुलांसमोर सादर करण्यात आले होते. कार्यक्रम अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रमोद चौरागडे होते.तर प्रमुख अतिथी मनसे जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, सेवा संस्थेच्या सविता तुरकर, शिक्षक विकास कोहाड, मनसे तालुकाध्यक्ष सुरेश ठाकरे, उदय काळे आणि  प्रचार प्रमुख उदय पोफळी म्हणून उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. मनीष चौरागडे यांनी कमीत कमी शिवाजी महाराजांचा एक गुण अंगीकारण्याचे आवाहन मुलांना केले. या निमित्त मुलांनी पोवाडे, भाषण आणि कविता सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. आभार प्रदर्शन तिडके सरांनी केले.