4 नक्षलींचा खात्मा, शरीरावर बांधली होती स्फोटके

0
9

वृत्तसंस्था

रांची,दि.19- झारखंडमधील नावाडीहच्या जंगलात शुक्रवारी पहाटे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी (सीआरपीएफ) चालवलेल्या एन्काउंटरमध्ये चार नक्षलींचा खात्मा करण्यात आला. यात एका महिलेचा समावेश आहे. सर्च ऑपरेशनमध्ये नक्षलींची मृतदेह आढळून आली. धक्कादायक म्हणजे, मृत नक्षलींच्या शरीरावर स्फोटके बांधले होते. सीआरपीएफच्या जवानांनी स्फोटके निकामी (डिफ्यूज) केली आहेत. नक्षलीचा मोठा घातपात करण्‍याचा इराद्याने आलेल्याचे बोलेले जात आहे.
– सीआरपीएफचे नावाडीहमधील जंगलात सर्च ऑपरेशन सुरु असताना 40 पेक्षा जास्त नक्षलींनी जवानांच्या दिशेने गोळबार केला आहे.
– रांची-जमशेदपूर एनएच-33 महामार्गावर बुंडू-धाधराबेडाजवळ पोलिस आणि नक्षलींमध्ये चकमक झाली. 
-गुरुवारी मध्यरात्री सीअारपीएफने एन्काउंटर सुरु केले. शुक्रवारी पहाटे चार नक्षलींना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. नक्षलींचे मृतदेह त्याबाबत घेण्यात आले आहे.
– नक्षलींच्या मृत शरीरावर स्फोटके बांधल्याचे आढळून आले. स्फोटके निकामी (डिफ्यूज) करण्‍यात
– डॉग स्क्वॉडच्या मदतीने इतर नक्षलींचा शोध घेण्यात येत आहे.