मोबाईलप्रमाणे योगालाही आयुष्याचा महत्वाचा भाग बनवा – नरेंद्र मोदी

0
6

चंदिगड, दि. 21 – ज्याप्रमाणे मोबाईल फोन तुमच्या आयुष्याचा महत्वाचा भाग झाला आहे, त्याप्रमाणे योगालाही महत्वाचा भाग बनवा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दुस-या आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या निमित्ताने चंदिगडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. 30 हजार लोकांसोबत योग केला. या कार्यक्रमाला पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि राज्यपाल कप्तानसिंह सोलंकी उपस्थित होते. या ठिकाणी योगासनेदेखील करण्यात आली ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: सहभागी झाले होते.दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारत सरकारने देशभरात एक लाख २६० ठिकाणी योगाभ्यास कार्यक्रम आयोजित केले आहेत. हे सर्व कार्यक्रम स. ६.३० वाजता सुरु करण्यात आले.