देशभर मद्यबंदीचा विचार नाही- केंद्र सरकार

0
11

वृत्तसंस्था
नवी दिल्ली – केंद्र सरकार राज्य सरकारांना त्यांच्या राज्यात मद्यबंदी करण्यासाठी मदत करेल मात्र संपूर्ण देशात मद्यबंदीचा विचार नसल्याची माहिती केंद्र सरकारने आज लोकसभेत दिली.

केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज गंगाराम अहिर यांनी यासंदर्भातील एका लेखी प्रश्‍नाच्या उत्तरात याबाबत माहिती दिली. बेकायदेशीर किंवा बनावट मद्य पिऊन 2012 मध्ये 731, 2013 मध्ये 497 तर 2014 मध्ये 1699 जणांचा मृत्यु झाल्याची माहिती त्यांनी दिली. उत्पादन शुल्क कायद्यानुसार 2014 मध्ये 2.83 कोटी लिटरचे मद्य जप्त करण्यात आले. त्यामध्ये 91 लाख लिटर देशी मद्याचा समावेश होता. केंद्र सरकार राज्य सरकारांना त्यांच्या राज्यात मद्यबंदी करण्यासाठी मदत करेल, मात्र देशभर मद्यबंदीचा विचार नसल्याचेही ते म्हणाले.