‘जय’ च्या चौकशीला पुन्हा वेग

0
11

नागपूर दि. १८ – : उमरेड-कऱ्हांडला येथून अचानक गायब झालेल्या ‘जय’ या वाघाची अखेर उच्चस्तरीय (केंद्रीय) चौकशी सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या २० जानेवारी रोजी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) बंगळुरु येथील विभागीय कार्यालयाचे इन्स्पेक्टर जनरल आॅफ फॉरेस्ट (आयजी) पी. एस. सोमाशेखर नागपुरात दाखल होत असल्याची माहिती पुढे आली आहे. यानंतर ते २३ जानेवारीपर्यंत नागपुरात मुक्काम ठोकणार असून, दरम्यान उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यासह नागपूर सभोवतालच्या जंगलांचा दौरा करणार आहेत. यानंतर ते आपला अहवाल दिल्ली येथील एनटीसीए मुख्यालयाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे सादर करतील.
या उच्चस्तरीय चौकशीने नागपूर वन विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ‘जय’ने पर्यटकांना भुरळ घातली होती. मात्र तेवढ्याच झपाट्याने तो उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून गायब झाला. त्यामुळे ‘जय’ सोबत काय झाले असावे, हा अद्याप अनुत्तीर्ण असलेला प्रश्न आहे.