बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आज गोंदियात

0
7

गोंदिया,दि.९ : बिहारचे मुख्यमंत्री हे आज ९ फेब्रुवारी रोजी गोंदिया येथे येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. दुपारी २.१० वाजता विमानाने बिरसी विमानतळ येथे आगमन व मनोहरभाई पटेल इंजिनियरिंग कॉलेजकडे रवाना. दुपारी २.२५ वाजता इंजिनियरिंग कॉलेज येथे आगमन. कॉलेजला भेट व पाहणी. दुपारी ३ वाजता गोंदिया एज्यूकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित कृषि व अन्य वस्तूंच्या प्रदर्शनाला भेट. दुपारी ३.३० वाजता स्व.मनोहरभाई पटेल यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त आयोजित स्वर्ण पदक वितरण समारंभाचे उदघाटन करतील. सायंकाळी ५.१५ वाजता बिरसी विमानतळ येथून विमानाने दिल्लीकडे प्रयाण करतील.