खा.शरद यादव यांना ओबीसी महाधिवेशनाचे आमंत्रण

0
4

नवी दिल्ली,- राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नवी दिल्ली येथे होऊ घातलेल्या द्वितीय ओबीसी महाधिवेशनासंबधी माहिती देण्यासाठी दिल्ली येथे राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, मंडल आयोगाचे खंदे समर्थक ओबीसी आंदोलनाचे नेते खासदार शरद यादव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन नवी दिल्ली येथे सात आँगस्टला होऊ घातलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महाधिवेशनाचे आमंत्रण देण्यात आले.सोबतच यावेळी महाराष्ट्रातील ओबीसी चळवळीसह देशातील ओबीसींच्या आंदोलनावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय पक्ष समन्वयक माजी खासदार डाँ खुशालचंद्र बोपचे,निमंत्रक सचिन राजुरकर व प्रसिध्दीप्रमुख संघटक खेमेंद्र कटरे उपस्थित होते. यावेळी खासदार यादव यांनी महाधिवेशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे. सोबतच जनगणना होणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. ओबीसी जनगणना व मंत्रालयाशिवाय ओबीसींचा विकास शक्य नाही, असे सांगत संवैधानिक अधिकारासाठी ओबीसींनी आंदोलनात व चळवळीत सहभागी होणे आवश्यक असल्याचे खा.यादव चर्चेच्यावेळी म्हणाले.त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनाही या महाधिवेशनाचे निमंत्रण त्यांच्या कार्यालयात देण्यात आले.केंद्रिय अवजड मंत्री अनंत गिते यांनाही महाधिवेशनाचे पत्र देण्यात आले.