ध्य प्रदेशात केंद्रानं पाठवले 1100 निमलष्करी दलाचे जवान

0
10

नवी दिल्ली, दि. 7 – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान राज्यात उफाळून आलेला हिंसाचार रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत, मात्र परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे कठीण होत चाललं आहे.  मंगळवारी (6 जून) पोलिसांच्या गोळीबारात 5 आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलन हिंसक झाले आहे. शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटद्वारे शेतक-यांना शांतता राखण्याचं आवाहन केले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मध्य प्रदेशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलावली होती.केंद्र सरकारने मध्य प्रदेशातील मंदसौरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी निमलष्करी दलाचे जवळपास 1100 जवान पाठवण्यात आले आहेत.  तसंच केंद्र सरकारनं बुधवारी राज्य सरकारकडून मध्य प्रदेशातील परिस्थितीबाबत अहवालही मागवला आहे. दरम्यान, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी (7 जून) पोलिसांच्या गोळीबारात मृत पावलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मंदसौर येथे रवाना झाले आहेत.