जिल्हा बँकेतील जुन्या नोटा आरबीआय स्वीकारणार

0
7
नवी दिल्ली, दि. 21-  राज्यातील जिल्हा बँकांमध्ये असणाऱ्या जुन्या 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेत भरायला केंद्राने मंजूरी दिली आहे. पोस्ट आणि जिल्हा बँकेतील जुन्या नोटा आरबीआय स्विकारणार आहे.  केंद्राच्या या निर्णयानुसार 30 जूनपर्यंत जिल्हा बँकांना त्यांच्याकडील जून्या नोटा आरबीआयमध्ये भरता येणार आहेत.
 ‘नोटाबंदीनंतर सर्वसामान्य लोकांनी जिल्हा बँकेत भरलेल्या जुन्या नोटा आरबीआयने घ्यायला नकार दिल्यामुळे बँका अडचणीत आल्या होत्या.पण केंद्राच्या या निर्णयामुळे जिल्हा बँकांना दिलासा मिळणार आहे. केंद्राने योग्य ती तपासणी करून हा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयानुसार 8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या काळात नागरीकांनी जिल्हा बँकेत भरलेल्या नोटा आरबीआय स्विकारणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरात दिली आहे. तसंच बँकेमध्ये पैसा नसल्याने शेतकऱ्यांना कर्ज द्यायचे कुठून हा प्रश्न जिल्हा बँकांसमोर होता. तो प्रश्न आता सुटेल असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

नोटाबंदीच्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला होता. याबाबतचा अध्यादेश रिझर्व्ह बँकेने काढला होता. त्यामुळे राज्यातील जिल्हा बँकांमध्ये गेली सहा महिने पडून असलेले हजारो कोटी रुपयांचे करायचे काय, असा प्रश्न बँकांसमोर होता.