शिक्षकाचे विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्ह फोटो, फेसबुकवर

0
9

नवी दिल्ली, दि. 4 – सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबुकवर एका शिक्षकाचे अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्ह काढलेले फोटो व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेले फोटोंमुळे विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी शिक्षकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप शिक्षकाला अटक केलेली नाही.
ही प्रकार आसाममधील हैलाकांडी जिल्ह्यात असलेल्या काटलीचेरा येथील शाळेतील आहे. येथील स्थानिक DY-365 वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, फैजुद्दीन लष्कर असे या शिक्षकाचे नाव असून त्याने शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत फोटोशूट केले. हे फोटोशूट करताना शिक्षकाने विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्ह फोटो काढले. या फोटोमध्ये शिक्षकाने विद्यार्थिनींना अश्लील स्पर्श केल्याचे दिसून येत आहे. तसेच, आक्षेपार्ह असे विद्यार्थिनींना मिठीत घेतल्याचे दिसते आहे.