2018 ची निवडणूक शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली लढणार – अमित शाह

0
9

भोपाळ,दि.19(वृत्तसंस्था) – 2018 मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात येणार असल्याचं भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे. शिवराज सिंग निवडणुकीत मुख्य चेहरा असतील हे अमित शाह यांनी जाहीर केलं असल्यामुळे इतर चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. शुक्रवारी काही पत्रकारांसोबत झालेल्या बैठकीत बोलताना अमित शाह यांनी हे स्पष्ट केलं. ‘2018 विधानसभा निवडणूक शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल हे मी स्पष्ट करु इच्छितो’, असं अमित शाह बोलले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शिवराज सिंग चौहान यांना भाजपाध्यक्ष दिल्लीला बोलावून केंद्रीय मंत्रीपद बहाल करणार असल्याची चर्चा सुरु होती. या पार्श्वभुमीवर अमित शाह यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.