हजारो कोटी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगीचे निधन

0
14

बंगळुरू,दि.27(वृत्तसंस्था) : सुमारे २० वर्षांपूर्वी महाराष्ट्रासह १२ राज्यांत झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचे गुरुवारी व्हिक्टोरिया इस्पितळात निधन झाले. तेलगी येथील कारागृहात ३० वर्षांची शिक्षा भोगत होता. अनेक वर्षे व्याधींनी जर्जर ५६ वर्षांच्या तेलगीला १० दिवसांपूर्वी इस्पितळात दाखल केले होते.
उद्या, शुक्रवारी खानापूर येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील. तेलगीचा मुद्रांक घोटाळा १९९९ मध्ये उघड झाला व २००१ मध्ये त्याला अटक झाली. तेलगीला ३० वर्षांच्या कारावासासह २०२ कोटी रुपये दंडाची शिक्षा झाली. तेलगीने हर्षद मेहताच्या रोखे घोटाळ्याच्या काळात हजारो कोटी रुपयांचे बनावट मुद्रांक छापून विकले. तेव्हा तो राजेशाही थाटात राहायचा. अनेक नेते व वरिष्ठ पोलीस अधिकाºयांचा त्याला वरदहस्त होता. त्यापैकी काही अधिकाºयांना अटकही झाली होती. मात्र नंतर क्लीन चिट मिळाली. छगन भुजबळ यांचे नावही त्याने नार्को टेस्टमध्ये घेतले होते.