नवमतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाला फेसबुकची साथ

0
6

२८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान मोहीम

मुंबई ,दि.28ः– भारतातले सुमारे २१७ अब्ज लोक फेसबुकवर आहेत. त्यामुळेच, १८ वर्षे वयाच्या नागरिकांना मतदार नोंदणी करायची आहे, हे आता निवडणूक आयोगातर्फे फेसबुकच्या माध्यमातून सांगितले जाणार आहे. या मोहिमेचा भाग म्हणून, २८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या काळात १८ वर्षे पूर्ण करणा-यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबतच न्यूज फीड रिमांइडर पाठवले जाईल आणि निवडणूक आयोगाकडे आपली नोंदणी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. इतकेच नाही, याआधीच वयाची १८ वर्षे पूर्ण सर्व केलेल्या तरुण-तरुणींना ३० नोव्हेंबर रोजी नोंदणीची आठवण करून देण्यासाठी रिमांइडर पाठवले जाईल.

नव्याने मतदानासाठी पात्र ठरणा-या सर्व तरुण भारतीयांना हे मतदारनोंदणी रिमाइंडर पाठवले जाईल. हे रिमाइंडर इंग्रजीसह, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलगु, मल्याळम, कन्नड, पंजाबी, बंगाली, उर्दू, आसामी, मराठी आणि उडिया आदी १३ भारतीय भाषांमध्ये असेल. ‘रजिस्टर नाऊ’वर क्लिक केल्यानंतर तुम्ही थेट National V’ters’ Services Portal इथे पोहोचाल आणि तिथे तुम्हाला नोंदणीसाठीच्या प्रकियेची माहिती दिली जाईल. भारतात पहिल्यांदाच नव्या मतदारांना ध्यानात घेऊन फेसबुकवर मतदार नोंदणी रिमाइंडरचा उपकम राबवण्यात येत आहे. भारतीय निवडणूक आयोगातर्फे १५ नोव्हेंबर रोजी पहिल्यांदाच मतदान करणा-या मतदारांच्या नोंदणीसाठी मोहीम जाहीर करण्यात आली आहे. आयोगाच्या या मोहिमेला हातभार लावण्यासाठीच फेसबुकवरील हा उपकम आखण्यात आला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त आचल कुमार ज्योती म्हणाले, १ जानेवारी २०१८ रोजी १८ वर्षाचे होणा-या किंवा त्याआधीच १८ चे झालेल्या भारतातील सर्व तरुण पात्र आणि संभाव्य मतदारांची नोंदणी करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने खास मोहीम सुरू केली आहे, ही घोषणा करताना मला फार आनंद होत आहे. निवडणूक आयोगाने माहितीचा प्रसार करण्यासाठी फेसबुकसोबत केलेल्या या भागीदारीमुळे भारतातील तरुण डिजिटल समुदायापर्यंत आमच्या ‘नो वोटर टू बी लेफ्ट बिहाइंड’ (कोणीही मतदार सुटता कामा नये) आणि ‘एव्हरी वोट काऊंट्स’ (प्रत्येक मत महत्त्वाचे आहे) या मोहिमा नेणे शक्य होणार आहेत.