केरळ विधानसभा अध्यक्षांचे निधन

0
9

तिरुअनंतपुरम – शनिवारी सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळ विधानसभा अध्यक्ष जी. कार्तिकेयन यांचे निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्यावर बंगळूरु येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

कार्तिकेयन यांच्या जाण्याने पक्षाला तसेच राज्याचे मोठे नुकसान झाल्याची भावना माजी संरक्षण मंत्री ए.के अँटोनी यांनी व्यक्त केली. कार्तिकेयन इतक्या लवकर आम्हाला सोडून जातील याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती असे त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या अनेक दिवसांपासून कार्तिकेयन यांच्यावर फ्फुफुसाच्या कर्करोगावरील उपचार सुरु होते. गेल्यावर्षी त्यांना अमेरिकेत उपचारानंतर भारतात आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर बंगळूरुमधील रुग्णालयात उपचार सुरु होते.