आलमच्या सुटकेच्या निषेधार्थ जम्मू न्यायालये बंद

0
9

वृत्तसंस्था
जम्मू- फुटीरतावादी नेता मसरत आलम याची सुटका केल्याच्या निषेधार्थ येथील वकिलांच्या संघटनेने विविध न्यायालयांमधील कामकाज स्थगित केले.

‘जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालय आणि इतर सर्व कनिष्ठ न्यायालयांमधील कामकाज आज बंद करण्यात आले,‘ असे जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय वकील संघटनेच्या एका प्रवक्त्याने सांगितले.

संघटनेचे सर्व सदस्यांनी काम केले नाही. ‘आलम याची सुटका करण्याच्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यासाठी आम्ही काम थांबविले,‘ असे त्यांनी सांगितले.
आलम हा देशद्रोही वक्तव्ये करीत असतो आणि पीडीपी-भाजप सरकार हे केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. आम्ही त्याच्या सुटकेचा तीव्र निषेध करतो, असे ते म्हणाले.