टाटा म्हणाले, मोदींवर विश्वास ठेवावा

0
10

मुंबई – भारतीय उद्योग क्षेत्रातील दोन दिग्गज उद्याेगपतींनी शुक्रवारी मोदी सरकारला दोन महत्त्वपूर्ण सल्ले दिले. रतन टाटा आणि गोदरेज या दोन दिग्गजांनी दोन वेगवेगळ्या प्रकारची मते मांडली आहेत. उद्योग जगताचा नव्या सरकारप्रति इतक्या लवकर मोहभंग व्हायला नको. पंतप्रधान मोदी यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यासाठी त्यांना वेळ द्यायला हवा. त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा, असे रतन टाटा म्हणाले, तर मागच्या काही दिवसांत चर्चवर झालेल्या हल्ल्यांबाबत आदि गोदरेज यांनी चिंता व्यक्त केली आहे. सरकारने अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवायले हवे, नाही तर गुंतवणूकदारांचे मतपरिवर्तन होऊ शकते, असे ते म्हणाले.
मोदींना पाठिंबा द्यायला हवा : रतन टाटा
मुंबईच्या इंटरनॅशनल स्कूल आॅफ बिझनेस बोकोनीच्या दीक्षांत समारंभादरम्यान रतन टाटा म्हणाले की, मोदी यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. आताच त्यांची सुरुवात झाली असून त्या आश्वासनांवर अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना वेळ द्यायला हवा. अापल्याला नवे राष्ट्र घडवायचे असेल, तर त्यांना पाठिंबा देणे गरजेचे आहे. सरकार काम करत नसल्याची धारणा मागच्या सरकारवेळी तयार झाली होती. नव्या सरकारने लोकांमध्ये महत्त्वाकांक्षा जागवली आहे, असेही ते या वेळी म्हणाले.