ओडिशाचे माजी मुख्यमंत्री जे. बी. पटनाईक यांचे निधन

0
13

भुवनेश्वर – ओडिशाचे माजी मुख्यमंत्री व आसामचे माजी राज्यपाल जनकी बल्लभ पटनाईक (वय 89) सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

पटनाईक सोमवारी सायंकाळी तिरुपतीमध्ये राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांच्या छातीत दुःखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर पुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जनकी पटनाईक यांचा 3 जानेवारी 1927 ला जन्म झाला होता. ओडिशामध्ये प्रथमच 1980 मध्ये काँग्रेसने सत्ता स्थापन केल्यानंतर पटनाईक यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले होते. त्यानंतर ते 1989 पर्यंत सत्तेत होते. त्यानंतर पुन्हा 1995 मध्ये ते सत्तेत विराजमान झाले. असे तीनवेळा ते ओडिशाचे मुख्यमंत्री होते. पटनाईक हे 2009 पासून आसामचे राज्यपाल म्हणून काम करत होते. पटनाईक यांनी 1947 मध्ये उत्कल विद्यापाठीतून संस्कृत विषयातून पदवीचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले होते.